आंबा घाटातील रिक्षा अपघातातील गंभीर जखमी रिक्षा चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू


रत्नागिरी- कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटातील गोवरेवाडी बस थांब्याजवळ आज पहाटे झालेल्या रिक्षा अपघातातील रिक्षा चालक सुरेश शामराव साळोखे (वय ६६) यांचा रत्नागिरी येथे उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला आहे.
दरम्यान, अपघाताचे निश्चित कारण समजू शकले नसले, तरी हा अपघात कसा झाला याची खातरजमा पोलीस करीत असून अज्ञात वाहनाने धडक दिली का? याची माहिती साखरपा पोलीस घेत आहेत. त्यासाठी आंबा येथील सीसीटीव्ही फुटेजची मदत घेतली जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button