
न्यायाधीश समाजाला न्याय देऊ शकतो -ऍड. विलास पाटणे
न्यायाधीश पद अत्यंत प्रतिष्ठित पद असून, त्यायोगे समाजाला न्याय देणे अधिक सोयीचे होईल. दिवाणी न्यायाधीश क. स्तर तसेच न्यायिक फौजदारी प्रथम वर्ग या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २८६ पदांकरिता ऑगस्टमध्ये परीक्षा घेत आहे. यासाठी रत्नागिरी बार असोसिएशनतर्फे आयोजित केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात अध्यक्ष ऍड. विलास पाटणे बोलत होते. सातत्य, परिश्रम आणि वाचन यातून यथ नक्की मिळेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला या परीक्षेला बारमधून चाळीस विद्यार्थी बसले आहेत. प्रथमच जिल्ह्यातील वकिलांनी ही परीक्षा गांभीर्याने घेऊन मोठ्या संख्येने सामोरे जात आहेत याचा आनंद आहे.
या प्रशिक्षण वर्गाला चांगला प्रतिसाद मिळाला असून त्यासाठी रत्नागिरी बारचे आपण अभिनंदन करतो. या वर्गासाठी सर्व न्यायाधीश सहकार्य करतील. या प्रसंगी प्रधान जिल्हा न्यायाधीश विनोद जाधव यांनी शुभेच्छा दिल्या. सुरुवातीच्या पहिल्याच सत्रात बी. एस. संकपाळ यांनी परीक्षेची तयारी कशी करावी तसेच पुराव्याचा कायदा या विषयावर उत्कृष्ट मार्गदर्शन केले. या प्रसंगी परीक्षार्थी मांगी चांगला प्रतिसाद दिला.www.konkantoday.com




