रत्नागिरी पोलिसांचा ’थर्ड आय’ निधीअभावी कमकुवत


चोरी, खून, दरोडे यांसारख्या गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलिसांकडे केवळ मनुष्यबळ किंवा तांत्रिक साधने असून, चालत नाहीत, तर पडद्यामागून माहिती पुरवणार्‍या खबर्‍यांचे मजबूत जाळेही अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र सध्या रत्नागिरी पोलिसांचा हाच ’थर्ड आय’ निधीअभावी कमकुवत होत असल्याचे चित्र समोर येत आहे.
गुन्हेगारी विश्वातील हालचालींची अचूक आणि गुप्त माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवण्याचे काम खबरे करत असतात. कोणत्याही मोठ्या गुन्ह्याचा तपास वेगाने पूर्ण करण्यामध्ये या खबर्‍यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मात्र, या माहितीदारांचे जाळे सक्रिय ठेवण्यासाठी आवश्यक असणारा विशेष निधी गृहविभागाकडून बंद करण्यात आल्याने पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
यापूर्वी पोलीस विभागात तपास आणि गुप्त माहिती मिळवण्यासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद केली जात होती. या निधीतून खबर्‍यांना आवश्यक आर्थिक मोबदला दिला जात असे. त्यामुळे स्थानिक पातळीवर पोलिसांचे नेटवर्क मजबूत राहून गुन्ह्यांची उकल जलदगतीने होत होती. मात्र आता हा निधी बंद झाल्याने अनेक पोलीस अधिकार्‍यांना तपासासाठी स्वतःच्या खिशातून खर्च करावा लागत असल्याची चर्चा आहे. खबर्‍यांना वेळेवर ’बिदागी’न मिळाल्यास ते माहिती देण्यास टाळाटाळ करतात. परिणामी, गंभीर गुन्ह्यांच्या तपासावर परिणाम होत असून अनेक प्रकरणांमध्ये तपासाची गती मंदावल्याचे चित्र दिसत आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button