कुवारबाव- आरटीओ ऑफिस जवळ रेल्वेतून पडून तरुण जखमी


कुवारबाव- आरटीओ ऑफिस जवळ रेल्वे रुळावर रेल्वेतून पडून तरुण जखमी झाला. ही घटना रविवारी सकाळी आठच्या सुमारास पडली. समीर मंगेश आडिवरेकर (३८, रा. तुळसवडे, (ता. राजापूर, रत्नागिरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याच्या डोक्याला व हातापायांना दुखापत झाली असून उपचारासाठी रेल्वे पोलिसांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. समीर आडिवरेकर हे कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वेने राजापूर ते मुंबई असा प्रवास करत होते. कुवारबाव आरटीओ आफिस रेल्वे रुळावर त्यांचा तोल जावून ते पडले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button