कोकणात ब्लॅक पँथर अर्थात काळ्या बिबट्यांच्या दर्शनाच्या घटनांमध्ये वाढ


मागील काही महिन्यांत कोकणात ब्लॅक पँथर अर्थात काळ्या बिबट्यांच्या दर्शनाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र समोर येत आहे. अतिशय दुर्मीळ मानल्या जाणार्‍या या काळ्या बिबट्यांची संख्या गेल्या काही वर्षांत कोकणात लक्षणीयरीत्या वाढल्याचे वन्यजीव अभ्यासकांचे निरीक्षण आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातही मेलेनिस्टिक लेपर्ड अर्थात काळ्या बिबट्याची नोंद झाल्याने जैवविविधतेच्या दृष्टीने ही महत्त्वाची घटना मानली जात आहे.
सह्याद्री ते कोकण हा वन्यप्राण्यांच्या स्थलांतरासाठी महत्त्वाचा पट्टा समजला जातो. कर्नाटकाकडून तिलारी व आंबोलीमार्गे येणारे वन्यजीव सह्याद्री परिसरात काही काळ वास्तव्य करून पुढे कोकणाच्या दिशेने मार्गक्रमण करतात. या स्थलांतरित वन्यजीवांमध्ये काळ्या बिबट्यांच्याही नोंदी आढळल्या आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button