पेपरफुटीचा दणका! प्रियंका गांधींचे ट्विट आणि २४ तासांत केंद्र सरकारचा मोठा निर्णय; नीट परीक्षा रद्द, पुन्हा होणार पेपर!!

NEET UG 2026 Exam Cancelled : देशातील २० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडवणारा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या मोठ्या निर्णयामुळे संपूर्ण देशातच खडबड उडाली आहे.

पेपर लीक झाल्यानंतर थेट नीट परीक्षा २०२६ रद्द करण्यात आली. पेपर लीक झाल्यानंतर सीबीआयने या प्रकरणात थेट परीक्षा रद्द करण्याचा आदेश दिला आहे. पेपरफुटी प्रकरणात चाैकशीचे आदेश सीबीआयकडून देण्यात आले. संबंध दोषींवर कारवाई केली जाणार आहे. नीट परीक्षा २०२६ रद्द करण्यात आली. यामुळे नागपूरमधील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झालेली आहे. विशेष म्हणजे लोकसभेच्या खासदार प्रियंका गांधी यांनी सोमवारी परीक्षेतील गैरप्रकारावर ट्विट केले होत. सरकारवर ताशेरे ओढले होते. यानंतर दुसऱ्याच दिवशी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला.

परीक्षेत काही झाली होती विद्यार्थ्यांची तपासणी

नॅशनल टेस्टिंग एजन्सी(एनटीए) द्वारे ३ मे रोजी देशातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता आवश्यक ‘नीट’ रविवारी नागपूरसह देशातील १५५ शहरात घेण्यात आली. नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रेंस टेस्ट (नीट) शहरात ६४ केंद्रावर शांततेत पार पडली. मात्र, पेपर संपल्यावर केंद्रसमोर विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. विशेष म्हणजे, भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्र विषयाचा पेपर कठीण होता अशी भावना काही विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

नीट परीक्षेमध्ये गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी एनटीएने आधीच कठोर नियम केले आहेत. परीक्षेदरम्यान इलेक्ट्रॉनिक्स उपकरणावर प्रतिबंधासह विद्यार्थ्यांच्या कपड्यापासून नियम केले होते. या नियमांमध्ये यावर्षीपासून आणखी कडक भर घालण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी एनटीएच्या संकेतस्थळावरून प्रवेशपत्राची छायांकित प्रत काढून पहिल्या पानावर अपलोड छायाचित्राप्रमाणे ‘पोस्टकार्ड’च्या आकाराचे छायाचित्र दुसऱ्या पानावर चिटकवायचे होते. इतक्या कठोर नियमाने परीक्षा झाल्यावर त्यामध्ये गैरप्रकार घडल्याचे समोर आले. त्यामुळे अखेर परीक्षा रद्द करण्याशिवाय सरकारकडे पर्याय उरला नव्हता.

पेपरफुटीच्या आरोपांनंतर मोठी कारवाई

राजस्थानसह काही राज्यांमध्ये परीक्षेचा पेपर आगाऊ उपलब्ध झाल्याच्या वृत्तांमुळे नीट (NEET) परीक्षेभोवतीचा वाद वाढला. यामुळे परीक्षेच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. एका अधिकृत निवेदनात, एनटीएने (NTA) म्हटले आहे की, ८ मे रोजी हे प्रकरण पडताळणी आणि तपासासाठी केंद्रीय यंत्रणांकडे सोपवण्यात आले होते. तपास यंत्रणांकडून मिळालेल्या माहिती आणि अहवालांच्या आधारे, सध्याची परीक्षा प्रक्रिया पुढे चालू ठेवता येणार नाही, असा निष्कर्ष काढण्यात आला. राष्ट्रीय परीक्षा प्रणालीवरील विद्यार्थ्यांचा विश्वास टिकवून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे, आणि म्हणूनच परीक्षा रद्द करण्याचा कठीण निर्णय घेण्यात आला, असे एजन्सीने म्हटले आहे.

प्रियंका गांधींनी काय आरोप केले होते

पुन्हा एकदा, नीट यूजी परीक्षेतील व्यापक अनियमिततेच्या बातम्या पसरत आहेत. भाजपच्या राजवटीत वर्षानुवर्षे देशातील तरुणांना ग्रासलेल्या भ्रष्टाचाराने त्यांचे भविष्य हिरावून घेतले आहे. यावेळी, अंदाजे २३ लाख विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. मुले नीटसारख्या परीक्षांसाठी अथक परिश्रम घेतात. पालक आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सर्वस्व पणाला लावतात. पण प्रत्येक परीक्षा भ्रष्टाचाराला बळी पडते. जर हाच भ्रष्टाचार जमिनीवर सुरूच राहिला, तर संसदेत मंजूर झालेल्या पेपरफुटीविरोधी तथाकथित कठोर कायद्याचा काय उपयोग? पंतप्रधान देशातील तरुणांना जबाबदार आहेत. त्यांचे भविष्य उद्ध्वस्त करण्याचे हे चक्र आणखी किती काळ चालणार?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button