
राजापूर तालुक्यातील गोवळ येथील आंबा बागेत नेपाळी कामगाराची आत्महत्या
राजापूर तालुक्यातील गोवळ येथील एका आंबा बागेमध्ये काम करणार्या नेपाळी कामगाराने बागेतील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सरजन विर्ख बहादूर शाही (६८, मूळ रा. नेपाळ) असे मृत कामगाराचे नाव आहे.
याप्रकरणी राजापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सरजन विर्ख बहादूर शाही हा नोव्हेंबर २०२५ पासून अबीद अल्ली अ. अजीज काझी यांनी करारावर घेतलेल्या गोवळ, खालचीवाडी येथील आंबा बागेमध्ये रखवालदार म्हणून कामाला होता. शुक्रवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास तो आंबा बागेमधील एका झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. याप्रकरणी राजापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.www.konkantoday.com




