
मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती उत्साहात
मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगांव येथे दिनांक ३० एप्रिल, २०२६ रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील एक महान समाजसुधारक, थोर संत आणि ओघवती वाणी असलेले प्रबोधनकार होते. त्यांनी लिहिलेली ‘ग्रामगीता’ ग्रामीण विकासाचा आणि ग्रामोन्नतीचा पाया मानली जाते. आपल्या ‘खंजिरी भजना’च्या माध्यमातून त्यांनी समाजजागृतीचे अभूतपूर्व कार्य केले. तुकडोजी महाराज यांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर प्रवास करून आध्यात्मिक, सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मतेचा उपदेश केला. त्यांच्या समाजोपयोगी आणि राष्ट्रभक्तीपर कार्यामुळे (विशेषतः भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागामुळे) तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना ‘राष्ट्रसंत’ ही पदवी बहाल केली.
या प्रसंगी प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर डॉ. चौधरी यांनी त्यांच्या कार्याविषयी माहिती दिली. महाविद्यालयातील सर्व अधिकारी/कर्मचारी वर्ग व विद्यार्थी यांनी उपस्थित राहून प्रतिमेस पुष्प अर्पण करून वंदन केले.




