
वाशी येथील फळमार्केटमध्ये ’रत्नागिरी हापूस’ला चांगला दर
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी येथील फळमार्केटमध्ये ’रत्नागिरी हापूस’ने दराच्या बाबतीत २१ एप्रिल रोजीच्या बाजारात वरचढपणा कायम राखला आहे. मुंबईच्या बाजारपेठेत सध्या विविध ठिकाणांहून आंब्याची मोठी आवक होत असली तरी ग्राहकांची पसंती आणि बाजारभाव या दोन्ही आघाड्यांवर रत्नागिरीचा आंबा आघाडीवर आहे.
वाशी मार्केटमध्ये २० एप्रिलला एकूण १५,२४४ क्विंटल आंब्याची आवक झाली. यामध्ये कोकण भागातून १७,७०८ क्विंटल, तर इतर हे आंब्याची नोंद झाली आहे. २१ पण एप्रिलच्या बाजारभावानुसार, रत्नागिरी रून हापूसला प्रति क्विंटल किमान ३०,००० रुपये तर कमाल ४०,००० रुपये इतका विक्रमी भाव मिळाला आहे. या वाणाचे सरासरी दर ३५,०००, रुपयांच्या घरात स्थिरावले आहेत. रत्नागिरीच्या देवगड तुलनेत हापूसचे दर २५,००० ते ३५,००० रुपयांच्या दरम्यान असून सरासरी भाव ३०,००० रुपये राहिला आहे.
www.konkantoday.com




