उन्हाळी सुट्टी रेल्वेची संख्या अपुरी असल्यामुळे चाकरमान्यांच्यात नाराजी


शाळा, महाविद्यालयांना लवकरच सुट्ट्या पडणार असून बच्चेकंपनीची कोकणात येण्यासाठी लगबग सुरू होणार आहे. उन्हाळी सुट्टी हंगामासाठी रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या गाड्यांची संख्या अपुरी असल्याने गाव गाठायचे कसे, अशी चिंता मुंबईस्थित कोकणवासियांना आतापासूनच सतावत आहे. रेल्वे प्रशासनाच्या घोषणेकडेच कोकणवासियांच्या नजरा खिळल्या आहेत.
उन्हाळी सुट्टी हंगामात नियमित गाड्या हाऊसफुल्ल धावतात. मध्य रेल्वे प्रशासनाकडून सद्यस्थितीत तीनच उन्हाळी स्पेशल चालवण्यात येत आहे. या स्पेशल गाड्यांचे आरक्षणही फुल्ल झाले असून प्रवाशांच्या हाती प्रतीक्षा यादीबरील तिकिटे पडली आहेत. यामुळे गाव गाठायचे कसे, असा प्रश्न कोकणवासियांना सतावत आहे. मुंबईसह पुणे येथून कोकणात येणार्‍या प्रवाशांची संख्या सर्वाधिक असते. या तुलनेत उन्हाळी स्पेशल गाड्या अपुर्‍या आहेत. काही दिवसांचाच अवधी उरलेला सुट्ट्यांचा हंगामा सुरू होण्यास असतानाही रेल्वे प्रशासनाने अजूनही अतिरिक्त गाड्यांची घोषणा केलेली नाही.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button