राजापूर भाजपाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

राजापूर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती राजापूर तालुका भाजपाच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यानी त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच त्यांच्या विचाराचे स्मरण करण्यात आले.
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणिस अभिजीत गुरव, तालुकाध्यक्ष मोहन घुमे, ॲड. एकनाथ मोंडे, जिल्हा उपाध्यक्षा सौ. शीतल पटेल, अनुसूचित मोर्चा जिल्हाध्यक्ष मारुती कांबळे, ओबीसी मोर्चा प्रदेश चिटणीस अनिल करगुटकर, महिला मोर्चा प्रदेश चिटणीस सौ. शिल्पा मराठे, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौ. श्रुती ताम्हनकर, तालुका उपाध्यक्ष सौ. रेणुका गुडये, अशोक पेडणेकर, नगरसेविका सौ. सुयोगा जठार, फारुख साखरकर, दत्ताराम चव्हाण, अमर वारीशे, सौ. शीतल गोठणकर, सुनील पटेल आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button