रत्नागिरी एमआयडीसीत टँकरच्या धडकेत वीज खांबासह डीपीचे मोठे नुकसान


रत्नागिरी एमआयडीसी क्षेत्रातील कुवारबाव येथे एका भरधाव टँकरने (बल्कर) वीज खांबांना आणि ट्रान्सफॉर्मरला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात महावितरणच्या मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले असून, सुमारे ११ लाख १७ हजार ५६२ रुपयांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ओमकार कॅश्यूकडे जाणार्‍या रस्त्यावर हा अपघात झाला. एका अज्ञात टँकर चालकाने आपल्या ताब्यातील वाहन अत्यंत हयगयीने आणि बेजबाबदारपणे चालवून रस्त्याशेजारील तब्बल सहा वीज खांब, ट्रान्सफॉर्मर डीपी आणि डिस्ट्रिब्युशन बॉक्सला धडक दिली. या धडकेमुळे खांब जमिनीवर कोसळले असून विजेच्या ताराही रस्त्यावर विखुरल्या होत्या. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र परिसरातील वीज खंडित झाला पुरवठा होता. याप्रकरणी एमआयडीसी उपविभागाचे सहाय्यक अभियंता प्रफुल्ल रविंद्र साळवे यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button