
राजापूर तालुक्यातील तळवडे खिंडीत पैशाच्या वादातून एकावर जीवघेणा हल्ला
राजापूर तालुक्यातील तळवडे खिंडीत पैशांच्या व्यवहारातून एका तरुणावर लाकडी दांडा व लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात गणेश आत्माराम आर्डे (२८, रा. पाचल बाजारवाडी) गंभीर जखमी झाले असून याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात मावस भावासह अन्य दोन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ३० मार्च रोजी सकाळी सुमारे ९.१५ वाजता गणेश आर्डे हे आपल्या पत्नीसह मोटारसायकलने मूळ गावी काजिर्डा येथे जात होते. ९.३० च्या सुमारास तळवडे खिंडीत पोहोचताच, त्यामागून आलेल्या एका अनोळखी व्यक्तीने मोटारसायकल त्यांच्या गाडीसमोर आडवी घालून त्यांना थांबवले. यावेळी गणेश यांचा मावस भाऊ पांडुरंग गणाजी पाटेकर (रा. कोळंब) याने जुन्या पैशांच्या व्यवहाराच्या वादातून लाकडी दांड्याने त्यांच्या उजव्या हातावर जोरदार प्रहार केला. त्याच्यासोबत असलेल्या दोन अनोळखी साथीदारांनीही हल्ला करत एकाने लोखंडी रॉडने पाठीवर वार केले.
www.konkantoday.com




