
रत्नागिरी शहराच्या नजिक असलेल्या मिरजोळे येथे उभारण्यात येणार्या जिल्हा क्रीडा संकुलाच्या कामाला वेग
रत्नागिरी शहराच्या नजिक असलेल्या मिरजोळे येथे जिल्ह्याच्या शीरपेचात मानाचा तुरा रोवणारे एक जिल्हा क्रीडा संकुल उभे राहत आहे. गेल्या काही वर्षापासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पाने आता वेग घेतला असून येत्या सहा महिन्यात म्हणजेच डिसेंबरअखेरपर्यंत हे संकुल खेळाडूंच्या सेवेसाठी सज्ज होणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून आणि विशेष पाठपुराव्यामुळे या कामाला गती मिळाली असून, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा येथे उपलब्ध करुन दिल्या जात आहेत.
या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे ३३ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली होती. या कामाचे नियोजन दोन टप्प्यात करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात मिळालेल्या ७ कोटी ४० लाख रुपयांच्या निधीतून जलतरण तलाव, बॅडमिंटन हॉल आणि क्रीडा कार्यालयाची उभारणी आधीच पूर्ण झाली आहे. तसेच जिम्नॅशियम आणि बास्केटबॉल कोर्टची कामेही प्रगतीपथावर आहेत. आता दुसर्या टप्प्यात १५ कोट ६७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यातून क्रीडा संकुलाचा चेहरामोहरा बदलणारी कामे केली जात आहेत.
www.konkantoday.com




