मालगुंडमध्ये प्राणी संग्रहालयाला हिरवा कंदील


रत्नागिरी जिल्ह्याच्या पर्यटन आणि जैवविविधतेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता प्रत्यक्ष रूपात उतरण्यासाठी संज्ज झाला आहे. जिल्ह्यातील मालगुंड येथे तब्बल २५ हेक्टर विस्तीर्ण जागेवर एक भव्य प्राणी संग्रहालय उभारण्यात येणार जिल्हा परिषद प्रशासनाने या असून, प्रकल्पासाठी १६० कोटी २७ लाख ६७हजार ७०८ रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. सिंधुरत्न समृद्ध योजनेच्या माध्यमातून या प्रकल्पाला निधीचा मोठा ओघ मिळणार असल्याने, कोकणच्या पर्यटनाला यातून नवी दिशा आणि मोठी चालना मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
या प्रकल्पासाठी मालगुंड येथे २५.४९ हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झाले असून, मूळ जमीन मालकांना ४.२८ कोटी रुपयांचा मोबदलाही अदा करण्यात आला आहे. सध्या या जागेच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत संरक्षक भिंतीचे काम वेगाने प्रगतीपथावर आहे. या संरक्षक भिंतीसाठी २१.७३ कोटींची मंजुरी असून, त्यापैकी ७ कोटींचा निधी आधीच वितरित करण्यात आला आहे. प्रकल्पाच्या निधी नियोजनाबाबत सांगायचे झाले तर, एकूण १६०.२८ कोटींच्या खर्चापैकी६०.७५ कोटी रुपयांना उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडून मंजुरी मिळाली आहे. उर्वरित
निधी एमआयडीसी आणि सिंधुरत्न समृद्ध योजनेतून उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी दिले आहे.
या प्रकल्पाच्या तांत्रिक आणि रचनात्मक आखणीसाठी नागपूर येथील प्रसिद्ध श्री. अरफाक अहमद कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांची वास्तुविशारद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सुरुवातीला या प्रकल्पाची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे असली, तरी आता हा संपूर्ण प्रकल्प एमआयडीसीमार्फत पूर्ण केला जाणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button