चिपळुणात वाशिष्ठी नदीतील ८० हजार घनमीटर गाळ उपसा


२०२१ च्या महापुरानंतर चिपळूण शहराला पुरमुक्त करण्याच्या दृष्टीने वाशिष्ठी नदीतील गाळ उपसा मोहिमेला यंदाही वेग देण्यात आला आहे. जलसंपदा विभागाच्या वतीने शहरातील बाजारपूल येथील गणेश विसर्जन घाट, गोवळकोट आणि पेठमाप परिसरात सध्या गाळ काढण्याचे काम सुरू असून आतापर्यंत सुमारे ८० हजार घनमीटर गाळ उपसा करण्यात आल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे.
शहर आणि परिसरात जुलै २०२१ मध्ये आलेल्या महापुरामुळे मोठ्या प्रमाणात सार्वजनिक तसेच खासगी मालमत्तेचे नुकसान झाले होते. त्यानंतर वाशिष्ठी आणि शिवदी नदीतील साचलेल्या गाळाचा मुद्दा ऐरणीवर आला. गाळ उपशाला गती देण्यासाठी नागरिकांच्या पाठिंब्याने चिपळूण बचाव समितीने महिनाभर आंदोलन छेडले होते. त्या आंदोलनानंतर प्रशासनाने गाळ उपशाच्या कामाला गती दिली होती.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button