गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉन निमित्त धावपटूंची आरोग्य तपासणी


****-
गणपतीपुळे येथे आयोजित करण्यात आलेल्या अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेनिमित्त देशभरातून आलेल्या धावपटूंची आरोग्य तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड यांच्या वतीने करण्यात आली. स्पर्धेत सहभागी झालेल्या धावपटूंना सुरक्षित आणि निरोगी वातावरणात स्पर्धा पूर्ण करता यावी यासाठी वैद्यकीय मदत केंद्र उभारण्यात आले होते.
या ठिकाणी डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांच्या टीमने धावपटूंची रक्तदाब, नाडी, ऑक्सिजन पातळी तसेच इतर आवश्यक तपासण्या केल्या. तसेच धावपटूंना आवश्यकतेनुसार प्राथमिक उपचार व आरोग्यविषयक मार्गदर्शनही देण्यात आले.
अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेसाठी देशातील विविध राज्यांमधून मोठ्या संख्येने धावपटू सहभागी झाले होते. स्पर्धेदरम्यान कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंडच्या आरोग्य पथकाने सतर्क राहून दिवस रात्र सेवा दिली.ही स्पर्धा रात्री 12 ते सकाळी 8 या वेळेत होती त्या साठी दुपारी 2 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 8 पर्यंत पूर्ण वेळ उपस्थित राहून आरोग्य केंद्राचे टीम ने सेवा दिली या साठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध आठल्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉ माहेश्वरी सातव यांचे मार्गदर्शना खाली मालगुंड आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यानी काम केले.
या वैद्यकीय मदत कार्याबद्दल स्पर्धा आयोजक तसेच धावपटूंनी आरोग्य विभागाचे कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button