मत्स्य विभागाला मिळाली नवीन वेगवान ’शारदा’ स्पीडबोट


रत्नागिरी येथील समुद्रकिनारी सध्या बेकायदेशीर मासेमारीचा ’धुमाकूळ’ सुरू असून, दिवसा सूर्यप्रकाशात आणि रात्री एलईडी दिव्यांच्या लखलखाटात समुद्राची संपत्ती ओरबाडली जात आहे. या राजरोस चालणार्‍या प्रकाराला आणि परप्रांतीय नौकांच्या घुसखोरीला चाप लावण्यासाठी सहाय्यक मत्स्यव्यवसाय विभागाच्या ताफ्यात बुधवारी शारदा नावाची अत्याधुनिक आणि वेगवान स्टील स्पीड बोट दाखल होत आहे. यामुळे नियम धाब्यावर बसवणार्‍या पर्ससीननेट धारकांचे धाबे दणाणले आहेत.
२८० जिल्ह्यात सुमारे पर्ससीननेट नौका आहेत. या नौकांना साडेबारा नॉटीकल मैल अंतराच्या आत समुद्रात मासेमारी करण्यास १ जानेवारीपासून बंदी आहे. पहिल्या दोन महिन्यात साडेबारा नॉटीकल मैल बाहेर केंद्र शासनाच्या अखत्यारितील समुद्रात जाऊन मासेमारी करणार्‍या नौकांना खर्चाइतकी मासळी मिळत नव्हती. त्यामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या अनेक नौका मालकांनी बेकायदेशीरपणे किनार्‍यावर दिवसा सूर्यप्रकाशात आणि रात्री एलईडीच्या प्रकाशात मासेमारी करण्यास प्रारंभ केला. बंदरापासून जवळच्या अंतरावर मासेमारी केल्याने इंधन व इतर खर्चाची बचत होते. मोठ्या प्रमाणात तारली मासा पकडला जात आहे. त्यामुळे या तारली मासा मिरकरवाडा बंदरात मोठ्या प्रमाणात उतरला जात आहे. या मासळीला फिशमिल कंपन्यांकड चांगला दरही मिळत आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button