
स्केटिंगमध्ये “रत्नागिरी” तर वॉल क्लाइंबिंगमध्ये “पुणे” अव्वल!

चिपळूण : तालुक्यातील सावर्डे – डेरवण येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्या माध्यमातून यंदाच्या डेरवण युथ गेम्स मधील स्केटिंग स्पर्धेत ८ वर्षाखालील मुला-मुलींमध्ये ठाण्याच्या रिहा शेट्टी, दहा वर्षाखालील मुलीमध्ये रत्नागिरी च्या स्पृहा सुर्वे, दहा वर्षाखालील मुलामध्ये रत्नागिरी च्या अद्वैत बहुतुले हे सुवर्णपदकाचे मानकरी ठरले आहेत.
या स्पर्धेत ८ वर्षाखालील मुला-मुलींमध्ये रत्नागिरी च्या शिवांश महाडीक याने तर सिंधुदुर्ग च्या देवांश कोळी याने ब्राँझ पदक मिळविले आहे. दहा वर्षाखालील मुलीमध्ये रत्नागिरी च्या नेहा शिंदे हिने तर रत्नागिरीच्या प्रिशा चव्हाण हिने ब्राँझपदक मिळविले आहे. दहा वर्षाखालील मुलांमध्ये रत्नागिरी च्या स्वतेज लाड व तर गौरांश कित्तूर याने अनुक्रमे सिल्वर व ब्राँझ पदक मिळविले आहे. तसेच
तर वॉल क्लाइंबिंग स्पर्धेमध्ये पुणेने अव्वल स्थान पटकाविले आहे.
वॉल क्लाइंबिंगच्या १५ वर्षाखालील मुलांमध्ये रत्नागिरीच्या सृजन पटवर्धन याने सुवर्ण आणि साताऱ्याच्या आशिष जगताप याने मिळविलेले सिल्व्हर हि दोन पदके व १८ वर्षाखालील मुलींमध्ये साताऱ्याच्या तनुजा महाडिक हिने मिळविलेले ब्राँझ अशी तीन पदके वगळता या स्पर्धेतील चारही प्रकारात पुणेने वर्चस्व मिळविले आहे.
१८ वर्षाखालील मुलांमध्ये पुण्याच्या आयुष पवार याने सुवर्ण.,विराज फाळके याने सिल्व्हर व ईशान सूर्यवंशी याने ब्राँझ पदक मिळविले आहे. १८ वर्षाखालील मुलींमध्ये पुण्याची वेदा चौधरी हिने सुवर्ण व इरावती ताटूस्कर हिने सिल्व्हर पदक मिळविले आहे. १५ वर्षाखालील मुलांमध्ये पुण्याच्या मौला सय्यद याने ब्राँझ पदक मिळविले आहे. तसेच १५ वर्षाखालील मुलींमध्ये पुण्याच्या ईशा वाघमारे हिने सुवर्ण., काव्या माळी हिने सिल्व्हर व मीरा चौधरी हिने ब्राँझ पदक मिळविलेले आहे.




