मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी बोगद्याजवळ कारच्या अपघातात एकाचा मृत्यू


मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी बोगद्याजवळ सोमवारी, सायंकाळी सुमारास भीषण अपघात घडला. कशेडी बोगद्याच्या परिसरात स्विफ्ट कारवरील चालकाचा ताबा अचानक सुटल्याने कारचा गंभीर अपघात झाला.या अपघातात कारमधील दोघे जण जखमी झाले असून त्यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, तर दुसऱ्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.

अपघाताची माहिती मिळताच भरणे नाका ब्रिजखाली २४ तास अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सेवेत असलेली जगद्गुरु रामनंदाचार्य श्री नरेंद्राचार्य जी संस्थान, नाणिज धाम यांची विनामूल्य रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी पोहोचली. रुग्णवाहिकेचे चालक सुरज हंबीर यांनी तत्काळ जखमींना प्राथमिक मदत देत दोघांनाही उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी येथे दाखल केले.

रुग्णालयात उपचार सुरू असताना एका जखमीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दुसऱ्या जखमीवर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक नागरिकांनी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button