रत्नागिरी जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव असलेले आयएएस अधिकारी एम. देवेंद्र सिंग यांच्या निलंबनाचे आदेश


रत्नागिरी जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव असलेले आयएएस अधिकारी एम. देवेंद्र सिंग यांच्या निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले आहेत. सभागृहात प्रदूषणविषयक मुद्द्यावर चर्चा सुरू असताना संबंधित प्रकरणावर ब्रीफिंगसाठी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी देवेंद्र सिंग यांना बोलावले होते. मात्र, ते ब्रीफिंगसाठी उपस्थित न राहिल्याने हा मुद्दा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला.

या प्रकाराची गंभीर दखल घेत सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी सभागृहात मुद्दा उपस्थित केला. प्रशासकीय शिस्त व जबाबदारीचा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर तालिका अध्यक्षांनी तत्काळ कारवाई करत आयएएस अधिकारी एम. देवेंद्र सिंग यांच्या निलंबनाचे आदेश दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button