
चांदोर फाटा येथे दुचाकी अपघातात तरूणाचा मृत्यू
रत्नागिरी तालुक्यातील चांदोर फाटा येथे दुचाकी अपघातात तरूणाचा मृत्यू झाला. ही घटना १९ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. श्रीमंत आप्पासाहेब बडची (३६, रा. सध्या निरूळ चिरेखाण, मूळ कर्नाटक) असे मृत स्वाराचे नाव आहे. बडची हे हेल्मेट न घालता दुचाकीवरून जात असताना निष्काळजीपणे वाहन चालविल्यामुळे अपघात झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या बडची यांचा मृत्यू झाला अशी नोंद पूर्णगड पोलिसांत करण्यात आली आहे.
www.konkantoday.com




