
पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला असताना हकालपट्टी आणि निलंबनाची केलेली कारवाई सुडबुद्धीने
पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा तीन महिन्यांपूर्वीच राजीनामा दिलेला असताना आमची हकालपट्टी आणि निलंबन करण्याचा प्रश्न येतो कुठे? पक्षीय राजकारणाशी काहीही संबंध नसताना आमच्यावर करण्यात आलेली कारवाई म्हणजे निव्वळ सुडाचे राजकारण आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया चिपळूणच्या माजी नगराध्यक्षा सौ. सुरेखा खेराडे, माजी नगरसेवक परिमल भोसले, युवा कार्यकर्ते श्रीराम शिंदे, सुधीर पानवलकर यांनी दैनिक सागरशी बोलताना दिली. सौ. खेराडे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, यापुढे अशी बदनामी सहन करणार नाही, आपण सहा महिन्यांपूर्वीच सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेतली होती. याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
माजी नगरसेवक परिमल भोसले यांनीही निलंबनाच्या कारवाईची खिल्ली उवडवली. मी १५ नोव्हेंबर २०२५ रोजी पत्रकार परिषदेत पद आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याचे जाहीर केले. शिवाय पक्षाने माझा राजीनामा मंजूर केला. राजीनामा दिल्यापासून पक्षीय राजकारणापासून पूर्णपणे अलिप्त आहे.www.konkantoday.com




