महाराष्ट्रात तीनवर्षांत साडेपाचशे सरकारी शाळा बंद !


  • राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याचा खटाटोप सुरू असतानाच महाराष्ट्रात मोठय़ा संख्येने सरकारी शाळा बंद पडत असल्याचे चित्र आहे. राज्यात महायुती सरकारच्या काळात गेल्या तीन वर्षांत जवळपास साडेपाचशे सरकारी शाळांना टाळे लागल्याची माहिती युडायसच्या अहवालातून पुढे आली आहे. त्याचवेळी शहरी भागाबरोबर ग्रामीण भागात खासगी शाळांच्या संख्येत वाहोताना दिसत असून वर्षभरात शंभरपेक्षा जास्त शाळा वाया आहेत.

सरकारी शाळांची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत असल्याने पालक खासगी माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश करीत आहेत. महाराष्ट्रात कमी पटाच्या शाळांची संख्या मोठी असून हजारो शाळा केवळ नावापुरत्या सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव युडियस प्रणालीमुळे पुढे आले आहे. राज्यात गेल्या तीन वर्षांत 547 शाळा बंद पडल्या. युडायस प्लसमध्ये यंदा झालेल्या विद्यार्थी नोंदणीनुसार राज्यात एकूण 1 लाख 8 हजार 90 शाळा असून त्यामध्ये 2 कोटी 15 लाखांहून अधिक विद्यार्थी पहिली ते बारावीचे शिक्षण घेत आहेत.

विद्यार्थ्यांची पटसंख्या खालावली

राज्यात चालू 2025-26 या शैक्षणिक वर्षात 7 हजार 742 शाळांमध्ये केवळ 1 ते 10 इतकीच पटसंख्या नोंदवली गेली आहे. तर 52 हजार 702 शाळा 11 ते 100 पटसंख्येवर तग धरून आहेत. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा, गडचिरोली या जिह्यांमध्ये अल्प पटसंख्येच्या शाळांची संख्या जास्त आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत एकूण पटसंख्येत मोठी घट नोंदली गेली आहे.

मोदींच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात देशात 93 हजार शाळा बंद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशभरात 93 हजार सरकारी शाळा बंद पडल्या आहेत. सरकारी आकडेवारीनुसार, 2014-15 ते 2019-20 या सहा वर्षांत तब्बल 70 हजारांहून अधिक शाळांवर टाळे लागले. 2020-21 ते 2024-25 या कालावधीतही सुमारे 18,700 पेक्षा जास्त शाळा बंद झाल्या.

सरकारी शाळांत अशी झाली घट

महाराष्ट्रात 2022- 23 मध्ये शाळांची संख्या 65 हजार 431 होती. 2023-24 मध्ये या शाळा 65 हजार 157 एवय़ा झाल्या. त्यानंतर 2024-25 मध्ये महाराष्ट्रातील शाळांची संख्या 64 हजार 884 एवझाली. पुकाळात त्यात आणखी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या जिह्यांत विद्यार्थी घटले

राज्यात गेल्या वर्षभरात काही जिह्यांत मोठय़ा प्रमाणात विद्यार्थी संख्या घटल्याचे दिसून येत आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिह्यात सर्वाधिक 2,803 विद्यार्थ्यांची घट झाली आहे. त्याखालोखाल सातारा 2645, भंडारा 1 651, रत्नागिरी 876 इतकी विद्यार्थी संख्या घटली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button