
वाटद शौचालय भ्रष्टाचार प्रकरणी कारवाई न झाल्यास २६ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तिरडी आंदोलन
वाटद शौचालय भ्रष्टाचार प्रकरणी कारवाई न झाल्यास २६ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तिरडी आंदोलन व उपोषण करण्यात येईल, असा इशारा माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघाच्यावतीने देण्यात आला आहे. यासंबंधी निवासी उपजिल्हाधिकारी सूर्यवंशी व जि. प मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांना निवदेन देण्यात आले आहे, अशी माहिती अधिकार कार्यकर्ता व पत्रकार नीलेश रहाटे यांनी दिली आहे.
यावेळी उपजिल्हाधिकारी सूर्यवंशी यांच्याशी राजापूर, रत्नागिरी, संगमेश्वर व चिपळूण तालुक्यांतील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्याबरोबर सविस्तर बैठक घेऊन अनेक तक्रारी सादर करण्यात आल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष मनोहर गुरव, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र बोथरे, लांजा तालुकाध्यक्ष जीतेंद्र चव्हाण, उपाध्यक्ष आनंद कांबळे, कार्याध्यक्ष प्रकाश खांडेकर, सिद्दिक खान, महिला विभाग तालुकाध्यक्ष नसिरा काझी, उपाध्ययक्ष संपदा जोशी, कार्याध्यक्ष तबसुम खाचे, सचिव लता करंबेळे, तसेच महाराष्ट्र राज्य सचिव समीर शिरवडकर यांच्यासह सक्रिय कार्यकर्ते अरविंद मोहिते, सुरेश घडशी, श्रीनाथ रहाटे, राजेंद्र घोसाळकर, प्रमोद रेवणे, राजेंद्र कांबळे व नसरीन लांबे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.www.konkantoday.com




