
राजापूर: तालुक्यातील धोपेश्वर पंचायत समिती गटातून जनतेचे कैवारी म्हणून तालुक्यात ओळख असलेले आक्रमक नेते अभिजीत गुरव यांची पंचायत समिती सदस्यत्वासाठी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी निश्चित
राजापूर: तालुक्यातील धोपेश्वर पंचायत समिती गटातून बलाढ्य व जनतेचे कैवारी म्हणून तालुक्यात ओळख असलेले आक्रमक नेते भाजपा जिल्हाउपाध्यक्ष अभिजीत गुरव यांची पंचायत समिती सदस्यत्वासाठी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी निश्चित झाली असून त्यांना पक्षाकडून एबी फाॅर्म देखिल देण्यात आला आहे अशी माहिती गुरव यांनी पत्रकारांना दिली आहे.त्यांनी विभागात कामाला देखील सुरुवात केली असून पक्ष पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच मतदारांचा देखील त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.त्यामुळे धोपेश्वर पंचायत समिती गटात थेट लढत होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
भाजपा जिल्हाउपाध्यक्ष तसेच राजापूर मधील एक सर्वसामान्य जनतेचे कैवारी व आक्रमक नेतृत्व म्हणून ओळख असलेले अभिजीत गुरव यांना या विभागात उत्स्फृर्त प्रतिसाद असल्याचे दिसून येत आहे.प्रत्यक्षात त्यांनी यापुर्वी भाजपाचे तालुकाध्यक्ष म्हणून जबरदस्त कामगिरी राजापूर तालुक्यात करून दाखवली होती.सर्वसामान्य लोकांच्या न्यायहक्कांसाठी थेट रस्त्यावर उतरून शासन आणि प्रशासनच्या विरोधात लढा देणारा,त्यातून यश मिळवणारा एक योद्धा म्हणून अभिजीत गुरव यांची ओळख संपूर्ण तालुक्यात निर्माण झाली आहे.बेरोजगार तरुणांच्या रोजीरोटीसाठी व नोकरीसाठी अहोरात्र काम करतानाच रात्रीअपरात्री गोरगरिबांच्या अडीअडचणीला धावून जाणारा निधड्या छातीचा अभीदादा ही वेगळी ओळख देखील त्यांची राहिली आहे.
गेली कित्येक वर्षे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत असताना या नेतृत्वाला राजकीय नशिबाची साथ फार कमी मिळाली,त्यामुळेच आता संधी उपलब्ध होताच त्यांनी लोकांच्या आग्रहास्तव राजकीय आखाड्यात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. गुरव यांनी गेले कित्येक वर्षे केलेले सामाजिक काम तसेच या परिसरात त्यांचा थेट संपर्क,त्यांच्याकडे असलेली तरुणांची टीम आणि पक्षासाठी केलेले संघटन पाहता त्यांना पंचियत समिती गटातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असल्याने ते एक महायुतीचे प्रबळ उमेदवार म्हणून गणले जात आहेत.




