
ग्रामीण भागात निवडणुकीच्या चर्चा रंगू लागल्या, लवकरच जि.प., पंचायत समितीच्या निवडणुका
रत्नागिरी जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. शहरातील निवडणूक रणधुमाळी हळूहळू आसरत असतानाच ग्रामीण भागात नव्या निवडणुकांच्या चर्चा रंगू लागल्या आहेत, ज्यामुळे गावपातळीवरील वातावरण तापू लागले आहे.
झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकांकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. जिल्ह्यातील दोन नगरपालिका आणि तीन नगरपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली असून, २१ तारखेला मतमोजणी झाली. निवडणूक आयोगाने महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यामुळे आता जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आचारसंहिता कधीही लागू होऊ शकते, असा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जात आहे. येत्या काही दिवसांत अधिकृत कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.
www.konkantoday.com




