हातखंबा नजीक अपघाताची मालिका सुरूच,डांबरमिश्रित गरम खडी घेऊन जाणारा भरधाव डंपर अचानक उलटून मागून येणाऱ्या स्विफ्ट कारवर कोसळला.


मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम केले अनेक वर्षे सुरू असून या कामामुळे हातखबा नजीक अनेक अपघात घडले असून त्यात काही जणांना जीवही गमवावा लागला आहे काल पुन्हा हातखंबा दर्गा येथील धोकादायक चढणीवर दुपारी सुमारे १२.४० वाजता भीषण अपघात घडला. डांबरमिश्रित गरम खडी घेऊन जाणारा भरधाव डंपर अचानक उलटून मागून येणाऱ्या स्विफ्ट कारवर कोसळल्याने सातारा येथील सहा प्रवासी गंभीर जखमी झाले. अपघाताची तीव्रता इतकी होती की डंपरमधील गरम खडी थेट कारवर पडल्याने कार डांबराने भरून गेली
या अपघातातील, डंपर (क्र. एमएच -०८-एपी- ५६५२) दाभोळेकडून रत्नागिरीच्या दिशेने जात होता. हातखंबा-दर्गा येथील चढावात आल्यावर डंपरचा ताबा सुटून तो उलटला. त्याच वेळी सातारा-रत्नागिरी दिशेने येणारी स्विफ्ट कार वर डंपर मधील गरम डांबरमिश्रित खडी कारवर पडल्याने आत अडकलेल्या प्रवाशांना गंभीर दुखापती झाल्या. या अपघातात जखमी झालेले सर्व सहा प्रवासी सातारा जिल्ह्यातील असून त्यांना तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये प्रज्ञा नितीन जाधव (२९), स्पृहा नितीन जाधव (६), वृंदा नितीन जाधव (४), नितीन जाधव (वाहनचालक), ऋषिकेश राजेंद्र शिंदे (२६) आणि ऋतुजा राजेंद्र शिंदे (२३) यांचा समावेश आहे.
दरम्यान, डंपर चालक विपूल थावरा दामोर (मूळ रा. राजस्थान) याला पोलिसांनी ताब्यात घेतले या परिसरातून रस्त्याच्या कामासाठी डंपरची मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते कंत्राटदारांचे हे डंपर वर अनेक वेळा परराज्यातील ड्रायव्हर काम करीत असतात रस्त्याचे काम सुरू असताना देखील डंपर मोठ्या वेगाने चालवले जातात त्याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने असे वारंवार अपघात घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button