
कामगारांवरील अन्यायाच्या निषेधार्थ बांधकाम कामगारांचे १० डिसेंबरला आंदोलन
राज्यात कल्याणकारी मंडळात २६ हजार कोटी रुपये जमा असून २० लाख अर्ज प्रलंबित आहेत. विधवा महिला, प्रसुती योजना आणि या कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्तीचा लाभ नाकारण्यात आला आहे. त्यामुळे १० डिसेंबर रोजी जागतिक मानवाधिकार दिनी बांधकाम कामगारांवरील अन्यायाच्या निषेधार्थ जमेल त्या ठिकाणी आंदोलन करण्याचे आवाहन ज्येष्ठ कामगार नेते कॉ.. शंकर पुजारी यांनी केले आहे.
सध्या महाराष्ट्रामध्ये ६० लाख बांधकाम कामगारांची कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी आहे. दुसर्या बाजूस आजपर्यंत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे २६ हजार कोटी रुपये बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी उपकर हजार रुपयाची रक्कम सुद्धा मिळालेली नाही. दोन लाख रुपये नुकसान भरपाई मिळणे तर दूरच राहिली आहे.
www.konkantoday.com




