राजापूर शहरात बेशिस्त वाहन पार्क करणार्‍या १६ जणांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल


राजापूर शहर बाजारपेठेसह ओणी बाजारपेठेतील रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणार्‍या वाहन चालकांवर राजापूर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. बुधवारी एका दिवसामध्ये तब्बल १६ वाहन चालकांवर सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
राजापूर बाजारपेठेतील रस्त्यावर होणार्‍या बेशिस्त वाहन पार्कींगमुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत असते. शहरातील रस्ते अरुंद असतानाही रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने बेशिस्तपणे वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीला रस्त्यावर अशी बेशिस्तपणे वाहने उभी करणार्‍यांवर राजापूर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. बुधवारी राजापूर बाजारपेठेसह ओणी बाजारपेठ व पुढे सौंदळकडे जाणार्‍या रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने उभी करणार्‍या १६ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. रस्त्यावर वाहने उभी करून सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी या १६ वाहन चालकांवर भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३चे कलम २८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे रस्त्यावर बेशिस्त वाहने पार्क करणार्‍या वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत. तर या कारवाईचे नागरिकांतून स्वागत झाले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button