
पुणे जिल्ह्यातील कसर्सई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत खेडमधील जान्हवी मोरेची तीन सुवर्णपदकांवर छाप
पुणे जिल्ह्यातील कसर्सई येथे नुकत्याच झालेल्या एंड्युरन्स आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत खेड तालुक्यातील ऐनवली गावच्या जान्हवी मोरे हिने चमकदार कामगिरी करीत भारताचा मान उंचावला. तिने तीन सुवर्ण पदके पटकावली.
सातवी इ-एच वर्गात शिकणार्या आणि मुलींच्या १२ वर्षाखालील गटातून सहभागी झालेल्या या कोकणकन्येने २० सेकंद, २ मिनिटे आणि ५ मिनिटे अशा तिन्ही प्रकारातील स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकावत अभूतपूर्व यश मिळवले. या चॅम्पियनशिपमध्ये भारत, नेपाळ, श्रीलंका, यूएई, सौदी अरेबिया, मालदीव, के निया आणि फिलिपाईन्स अशा दहा देशांतील स्पर्धकांन सहभाग नोंदवला होता. कडव्या आंतरराष्ट्री स्पर्धकांमध्येही जान्हवीने दाखवलेली तगड़ी दमखम आणि चिकाटी विशेष दखल घेण्याजोग ठरली. जान्हवीच्या या त्रिशतक सुवर्णयशात ऐनवलीसह संपूर्ण कोकणात आनंदाचा माहोल असून शाळा, गावकर्यांसह क्रीडा क्षेत्रातून तिच्यावर अभिनंदनांचा वर्षाव होत आहे. तिच्या पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी सर्व स्तरांतून हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.www.konkantoday.com




