चिपळूण नगरपालिका निवडणुकीत नसरीन खडस यांनी भरला उमेदवारी अर्ज

चिपळूण : नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी कार्यालयात मोठी गर्दी उसळली होती. या गर्दीत एक विशेष लक्षवेधी घटना घडली, ती म्हणजे चिपळूणमधील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या नसरीन खडस यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून त्यांनी चिपळूण नगरपालिका प्रभाग क्रमांक पा५च मधून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने महिला वर्ग तसेच वार्ड क्रमांक पाचमधील कार्यकर्ते उपस्थित होते.
नसरीन खडस यांची चिपळूण शहरात आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये सक्रिय सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ओळख आहे. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना मोठा जनसमर्थन लाभत असल्याचे दिसून येत आहे.
निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच १७ नोव्हेंबर रोजी त्यांनी अर्ज दाखल केल्याने प्रभाग क्रमांक ५ मधील लढत आता अधिकच रंजक होणार आहे. त्यांना मिळणारा लोकांचा पाठिंबा पाहता, या निवडणुकीत त्या एक प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button