माजी आमदार गणपत कदम यांच्या गाडीला गुरांच्या कळपाने धडक दिल्याने अपघात

राजापूरचे माजी आमदार गणपत कदम यांच्या इनोव्हा गाडीला बुधवारी सायंकाळी ७ वाजता महामार्गावर गाडगीळवाडी येथे अपघात झाला. या ठिकाणी समोरून आलेल्या ४ ते ५५ गुरांच्या कळपाने कदम यांच्या गाडीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे कदम यांना व चालकाला कोणतीही इजा झाली नाही. मात्र यात कदम यांच्या गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. माजी आमदार गणपत कदम हे बुधवारी सकाळी मुंबईहून आपल्या राजापुरातील पन्हळे गावी येण्यासाठी निघाले होते. सायंकाळी ७ वाजता महामार्गावर राजापूर गाडगीळवाडी येथे गाडी आली असता महामार्गावर समोरून येणार्‍या ४ ते ५ गुरांच्या एका कळपाने थेट कदम यांच्या गाडीलाच धडक दिली. मात्र चालक मनोज देवधर याने प्रसंगावधान दाखवत गाडी आवरल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र गाडीच्या पुढील व उजव्या बाजूचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कदम हे सुखरूप असून त्यांना कोणतीही इजा झाली नसल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांकडून देण्यात आली. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button