
चिपळूण तालुक्यातील चिंचघरी-खोतवाडीतील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड
चिपळूण तालुक्यातील चिंचघरी-खोतवाडी येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकल्याची घटना सोमवार दि. १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास पडली. या कारवाईत आठजणांना जुगार खेळताना रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
संतोष मधुकर चाळके (३४, रा. चिंचघरी खोतवाडी), अरविंद गोविंद चाळके (४४, रा. चिंचघरी खोतवाडी), राकेश रमेश चव्हाण (३८, रा. दळवटणे रामवाडी), अतिक अहमद पांगरकर (२३, रा. कान्हे मोहल्ला), अमोल भालचंद्र अधटराव (३९, रा. सुवर्ण संकुल, सतीस्टॉप), बैकर (२८, रा. पिंपळी खुर्द नाका), तेजस सदानंद पवार (३०, रा. अनारी गणेशवाडी), महादेव धोंडु झिमण (५४, रा. अडरे कान्हे फाटा) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण सदाशिव जाधव यांनी पोलिसात दाखल केली आहे.
www.konkantoday.com



