दापोली पोलीस ठाणे येथे दापोली पोलीस ठाणे आणि निवेदिता प्रतिष्ठान यांच्या संयुक्त उपक्रमातून साकार झाले कायद्याचे म्युझियम आणि कचर्‍यातून सौंदर्य निर्मिती प्रकल्प

दापोली पोलीस ठाणे येथे दापोली पोलीस ठाणे आणि निवेदिता प्रतिष्ठान यांच्या संयुक्त उपक्रमातून साकार झालेले कायद्याचे म्युझियम आणि कचर्‍यातून सौंदर्य निर्मिती या प्रकल्पाचे उदघाटन रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रकल्पाबाबत बोलताना प्रकल्पाचे प्रमुख प्रशांत परांजपे यांनी सांगितले की, दापोली पोलीस स्थानक हे महाराष्ट्रातील पहिले पोलीस ठाणे आहे. ज्या ठिकाणी स्वच्छतेच्या संदर्भातील संदेश आणि कायद्याच्या संदर्भातील बोलकं म्युझियम आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील आणि तत्कालीन पोलीस उपविभागीय अधिकारी प्रविण पाटील यांनी इकोफ्रेंडली परांजपे म्युझियमला भेट दिली. अशा या पद्धतीचे आगळ्या वेगळ्या स्वरूपाचं पोलीस स्टेशनमद्ये म्युझियम उभारण्याबाबत त्यांच्याकडे चर्चा झाली आणि त्यांच्या सकारात्मक मान्यतेमुळे हा प्रकल्प पूर्ण होवू शकला. नजरचुकीने अथवा माहितीच्या अभावामुळे किंवा जीणीवेेनेही अनेक चुकीच्या गोष्टी समाजात घडत असतात. त्या गोष्टी प्रत्यक्षात समोर दिसल्यानंतर आपण भानावर येवू शकतो. या भावनेतून या ठिकाणी उभारलेल्या वणवा, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, विना हेल्मेट गाडी चालवताना होणारे अपघात, अल्पवयीन विद्यार्थ्यांनी गाडी न चालवणे, ट्रिपल सीट गाडी न चालवणे, त्याचप्रमाणे पोक्सो कायदा काय आहे, गाडी चालवताना मोबाईलवर बोलणं घातक आहे. अंधश्रद्धा निर्मुलन संदर्भात तसेच समानता दर्शविणारे प्रतिकात्मक फलक आणि प्रतिकृती या ठिकाणी उभारण्यात आले आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button