मंडणगड शहरातील बाईकप्रेमी निखीलने दुचाकीवरुन केवळ तेरा दिवसात पूर्ण केला आंबडवे ते नेपाळ प्रवास


भारत भ्रमण पूर्ण केलेल्या मंडणगड शहरातील निखील चंद्रकांत पिंपळे या बाईक प्रेमी रायडरने ऑक्टोंबर महिन्यात आंबडवे ते नेपाळ परतीच्या प्रवासासह ५२५० किलोमीटर इतक्या लांबीचे अंतस् असलेली आंतरराष्ट्रीय दुचाकी सबारी एकट्याने ११ ते २३ ऑक्टोबर २०२५ या केवळ तेरा दिवसाचे कालावधीत पुर्ण करुन एक अनोखा विक्रम प्रस्थापीत केला आहे.
सुरुवातीपासून सोलो बाईकींगची आवड असणार्‍या निखीलने या आधी उत्तराखंड, गोवा, जम्मूकाश्मिर, लेह लडाख या ठिकाणांना सोलो बाईंकीग करीत भेट दिली आहे. वयाच्या पन्नाशीकडे सरकत असलेल्या निखीलचे बाईक सवारीचे प्रेम तालुक्यात सर्वांना परिचीत आहे. आपल्या प्रापंचीक व व्यावसायिक जबाबदार्‍या उत्तमपणे संभाळणार्‍या निखीलने आपली ही आवड आपल्या कर्तव्यात कधीही अडसर बनून दिलेली नाही. वयोमानपरत्वे बदलत्या काळातील शुगर बीपी असे आजार त्यालाही आहेत व दोन महत्वाच्या शस्त्रक्रीयाही झाल्या आहेत. मात्र उच्च मनोबल व आत्मविश्वास शरीर व वाहनांची योग्यवेळी योग्य ती काळजी घेत सर्वसमान्यांना अशक्यप्राय वाटणारी गोष्ट त्याने शक्य करून दाखवली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button