
पतसंस्थेत झालेल्या ४ कोटी २२ लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी आणखी दोन महिला संचालकांना अटक
खेड तालुक्यातील भरणे येथील शामराव नागरी सहकारी पतसंस्थेत झालेल्या ४ कोटी २२ लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी तेजा राजाराम बैकर, रेवती चंद्रकांत खातू या दोन महिला संचालकांना पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवस पोलीस कोठडीत सुनावण्यात आली.
अपहार प्रकरणी पतसंस्थेचे अध्यक्ष दत्ताराम बैकर, उपाध्यक्ष सुधाकर शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रिया सुतार, संचालक सुभाष शिंदे या चौघांना यापूर्वीच न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यातील शशिकांत नथुराम शिंदे यांची जामिनावर मुक्तता झाली आहे. उर्वरित संचालकांवरही अटकेची टांगती तलवार कायम आहे. विनोद अंडूस्कर याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. संशयितांनी पतसंस्थेच्या ३ कोटी ७९ लाख ६०. हजार ६०९ रुपयांचे आर्थिक नुकसान आणि बनावट मुदत ठेव पावत्या छापत ४ कोटी २२ लाख ८१ हजारांचा अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.www.konkantoday.com




