
खेड तालुक्यातील लवेल येथील घरडा हॉस्पिटलमध्ये तरुणाचा मृत्यू
खेड तालुक्यातील लवेल येथील घरडा हॉस्पिटलमध्ये ४५ वर्षीय प्रौढाचा आकस्मिक मृत्यू झाला. योगेश कृष्णा शिर्के (रा. खोपड-चौथाईवाडी, चिपळूण) असे मृत प्रौढाचे नाव आहे. लोटे येथील ए.बी.मौर्या कंपनीत ते कामावर गेलेले असताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले. चक्कर येऊन बेशुद्ध पडल्यानंतर कंपनीच्या वाहनाने उपचारासाठी घरडा. हॉस्पिटलमध्ये दाखल केले. वैद्यकीय अधिकार्यानी तपासले असता त्यांना मृत घोषित केले. येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
www.konkantoday.com




