
रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांना मातृशोक; प्रेमा मयेकर यांचे निधन
रत्नागिरी : रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष तथा उद्योजक महेंद्र मयेकर यांच्या मातोश्री श्रीमती प्रेमा मधुकर मयेकर (वय ९०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
त्यांच्या निधनाने मयेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, एक मुलगी, जावई, नातवंडे, पणतू असा मोठा परिवार आहे.
श्रीमती प्रेमा मयेकर यांच्या पार्थिवावर आज दुपारी अडीच वाजता रत्नागिरी येथील मुरुगवाडा हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.




