दापोलीतील उर्वरित खोके, टपर्‍या दोन दिवसात हटवा, नागरिकांची मागणी


दापोली शहरातील खोके व टपरीधारकांवर नगरपंचायतीन मंगळवारी जेसीबीच्या साहाय्याने केलेल्या कारवाईचे तीव्र पडसाद उमटले असून, ही कारवाई कायद्याला धरून नसल्याचा आरोप करत खोके व टपरीधारकांनी आता थेट नगरपंचायतीविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. येत्या दोन दिवसांत शहरातील उर्वरित सर्व खोके व टपर्‍या नगरपंचायतीने जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त केल्या नाहीत, तर नगरपंचायतीसमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा समन्वयक मंगेश मोरे यांनी दिला आहे. त्यामुळे शहरातील अतिक्रमण कारवाईचा वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button