तर आम्ही ही सत्ता उलथवण्यासाठीच उभे आहोत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा थेट इशारा


निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात गेल्या जवळपास महिनाभरापासून देशभरात विरोधाची लाट आहे. त्यातच काँग्रेसनंतर दिल्लीतील आंदोलनाची बाजू कॉकरोच जनता पार्टीने खांद्यावर पेलली आहे.पण आंदोलकांची मुस्कटादाबी सुरू असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. विरोधी पक्ष आणि इतर संघटनांच्या आंदोलकांवर दिल्ली पोलिसांनी जी कारवाई केली. त्यावरून शिवसेना (UBT) पक्ष प्रमुख उद्धवठाकरे यांनी जहरी टीका केली आहे. त्याचवेळी त्यांनी शिवसेनेची तडक भूमिका जाहीर केली. लोकशाहीत विरोधाचा आणि मतदानाचा हक्क हिरावणाऱ्या सरकारला हटवाच असा थेट इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. त्यांच्या या वक्तव्याचे देशातील राजकीय वर्तुळात मोठे पडसाद उमटले आहेत.प्रशांत भूषण जे बोलले, रिजीम चेंज. हो, आम्ही रिजीम चेंज करायलाच उभे आहोत, काय म्हणणं आहे तुमचं? जर तुम्ही आमच्याकडून निवडणुकीच्या माध्यमातून आमचं मत व्यक्त करण्याचा अधिकार काढून घेत असाल, आंदोलन करण्याचा अधिकार काढून घेत असाल, तर आम्ही ही सत्ता उलथवण्यासाठीच उभे आहोत.” असा थेट इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे अखिल भारतीय पत्रकार परिषदेकडून आयोजित आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांनी सत्ताबदलासाठी एल्गार पुकारला. त्यांनी थेट पत्ता फेकला. त्यांच्या या वक्तव्याचे आज दिवसभरात पडसाद पाहायला मिळतीलच. पण सरकारला हादरे द्यायचे आहेत हे त्यांनी कोणताही आडपडदा न ठेवता जाहीर केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button