कॉर्पोरेट जगतात हाहाकार! एका रात्रीत 4 हजार कर्मचाऱ्यांच्या हाती नारळ देणाऱ्या निर्णय; सर्वात मोठी कपात जाहीर!

नवी दिल्ली : नेटफ्लिक्स आपल्या 6 टक्के कर्मचाऱ्यांची कपात करत आहे. कंपनीतील जवळपास 1,000 लोकांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. 2022 नंतरची ही कंपनीची आतापर्यंतची सर्वात मोठी कर्मचारी कपात आहे.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार नेटफ्लिक्सचे सह-मुख्य कार्यकारी अधिकारी (Co-CEO) ग्रेग पीटर्स आणि टेड सारंडोस यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमधून ही माहिती समोर आली आहे. ही कर्मचारी कपात प्रामुख्याने नेटफ्लिक्सच्या प्रोडक्ट, टेक्नॉलॉजी, लीगल आणि ह्युमन रिसोर्सेस या विभागांमध्ये होणार आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस कंपनीत जवळपास 16,000 कर्मचारी कार्यरत होते.

नेटफ्लिक्स हे मागणीनुसार मनोरंजन सामग्री उपलब्ध करून देणारे ओव्हर-द-टॉप (OTT) स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवर सबस्क्रिप्शनच्या माध्यमातून टीव्ही शो, चित्रपट, माहितीपट, गेम्स, अ‍ॅनिमे आणि इतर मनोरंजन शो पाहता येतात.

कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या संदेशात म्हटले आहे की, जगाचे मनोरंजन करणे हे आमचे ध्येय आहे आणि हे ध्येय खूप मोठे आहे. ते पूर्ण करण्यासाठी आम्ही आमचे कर्मचारी आणि संसाधनांना कोणत्या कामांसाठी प्राधान्य देतो, याबाबत शिस्तबद्ध राहणे आवश्यक आहे. आमचा व्यवसाय मजबूत आहे आणि त्यात वाढ होत आहे. तसेच आम्ही संपूर्ण वर्षासाठी निश्चित केलेल्या अंदाजित उद्दिष्टांच्या दिशेने वाटचाल करत आहोत. यंदा आतापर्यंत नेटफ्लिक्सच्या शेअर्समध्ये जवळपास 25 टक्क्यांची घसरण झाली आहे.

यापूर्वी नेटफ्लिक्सने 2022 मध्ये मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली होती. त्या वेळी व्यवसायातील मंदावलेली वाढ आणि सबस्क्राइबर्सची घटती संख्या यामुळे कंपनीने शेकडो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या कमी केल्या होत्या. एका दशकाहून अधिक काळात पहिल्यांदाच नेटफ्लिक्सच्या ग्राहकसंख्येत मोठी घट नोंदवण्यात आली होती.

क्रोगरमध्ये 3,000 नोकऱ्या कमी होण्याची शक्यता

अलीकडेच अमेरिकेतील किराणा माल विकणारी कंपनी क्रोगर आपल्या कामकाजाच्या पद्धतींमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) समावेश करत असल्याची बातमी समोर आली होती. याच पार्श्वभूमीवर कंपनी पुढील तीन वर्षांत जवळपास 3,000 कॉर्पोरेट पदे कमी करण्याची योजना आखत आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार क्रोगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रेग फोरन यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या संदेशात ही माहिती दिली आहे. कंपनीच्या या निर्णयाबाबत सर्वप्रथम ब्लूमबर्ग न्यूजने वृत्त दिले होते.

ग्रेग फोरन यांनी फेब्रुवारीमध्ये क्रोगरच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी स्वीकारली होती. या कर्मचारी कपातीमुळे कंपनीतील 8,200 कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांपैकी जवळपास 37 टक्के कर्मचाऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यापूर्वी गेल्या वर्षी जूनमध्ये कंपनीने जवळपास 1,000 कॉर्पोरेट पदे कमी केली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button