मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथील नव्या जगबुडी पुलालगतची संरक्षक भिंत उभारण्याचे काम सुरू


मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथील नव्या जगबुडी पुलालगतच्या मोकळ्या जागेतून कंटेनर थेट नदीपात्रात कोसळून चालकाचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या राष्ट्रीय महामार्ग विभागाने गर्डर बसवत मलमपट्टी केली. यावर टीकेची झोड उठल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाने मोकळ्या जागी संरक्षक भिंत उभारण्याचे काम हाती घेतले आहे. यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.
भरणे नवा जगबुडी पूल अपघातांच्या दृष्टीने ’हॉटस्पॉट’ बनला आहे. विशेषतः अवजड वाहतुकीच्या वाहनांना घडणार्‍या अपघातांमुळे पादचार्‍यांची वाहनचालकांसह सुरक्षितता ऐरणीवर आली आहे. अपघात रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून केवळ मलमपट्टी करण्याचा प्रकार सुरू असल्याने अपघात थांबता थांबेनासे झाले आहेत. अवजड वाहनांमुळे घडणान्या अपघातात संरक्षक भिंतीची नासधूस होत असून पुलालाही धोका पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button