माजी सैनिक व वीर कुटुंबियांच्या समस्या निवारणासाठी खेड, चिपळूणमध्ये सप्टेंबर महिन्यात विशेष दौरे


रत्नागिरी, दि. ३१ ) : जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा, वीर नारी, वीर माता व वीर पिता यांच्या विविध अडचणी व समस्या जागेवरच सोडवण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत पुढाकार घेण्यात आला आहे. त्यानुसार सप्टेंबर २०२६ मध्ये खेड आणि चिपळूण या तालुक्यांमध्ये कल्याण संघटकांच्या विशेष दौऱ्यांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी दिली आहे. या विशेष दौऱ्यांदरम्यान माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना भेडसावणारे अभिलेख कार्यालय विषयक (Record Office) प्रश्न, पेन्शन विषयक अडचणी, महासैनिक पोर्टलवर नवीन नोंदणी तसेच इतर सर्व प्रशासकीय अडचणींचे जागेवरच निवारण केले जाणार आहे.
कल्याण संघटकांचे दौरे व सविस्तर वेळापत्रक:

  • ७ सप्टेंबर (सोमवार): सैनिकी मुलांचे वसतिगृह, खेड – अ.शा. कल्याण संघटक सुनील कदम
  • ८ सप्टेंबर (मंगळवार): सैनिकी मुलांचे वसतिगृह, चिपळूण – कल्याण संघटक राहुल काटे
  • १५ सप्टेंबर (मंगळवार): सैनिकी मुलांचे वसतिगृह, चिपळूण – अ.शा. कल्याण संघटक सुनील कदम
  • १६ सप्टेंबर (बुधवार): सैनिकी मुलांचे वसतिगृह, खेड – अ.शा. कल्याण संघटक सुनील कदम
  • २१ सप्टेंबर (सोमवार): सैनिकी मुलांचे वसतिगृह, खेड – कल्याण संघटक अनिल मोरबाळे
  • २२ सप्टेंबर (मंगळवार): सैनिकी मुलांचे वसतिगृह, चिपळूण – कल्याण संघटक अनिल मोरबाळे
  • २८ सप्टेंबर (सोमवार): सैनिकी मुलांचे वसतिगृह, खेड – अ.शा. कल्याण संघटक सुनील कदम
  • २९ सप्टेंबर (मंगळवार): सैनिकी मुलांचे वसतिगृह, चिपळूण – अ.शा. कल्याण संघटक सुनील कदम
    सोबत आणावयाची आवश्यक कागदपत्रे:
    या सुविधेचा लाभ घेण्यासाठी माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांनी मूळ प्रतींसह (Original) व छायांकित प्रतींसह (Xerox) खालील कागदपत्रे सोबत आणावीत:
  • महासैनिक पोर्टलवर (www.mahsainik.maharashtra.gov.in) नोंदणी केलेली पावती
  • डिस्चार्ज बुक (Discharge Book)
  • पी.पी.ओ. (PPO) ची प्रत
  • पॅन कार्ड
  • बँक पासबुक
  • ई.सी.एच.एस. (ECHS) कार्ड
  • आधार कार्ड व आधार क्रमांकाशी लिंक असलेला चालू मोबाईल फोन
    जिल्ह्यातील सर्व पात्र माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी जवळच्या केंद्रावर ठरवून दिलेल्या तारखेला उपस्थित राहून या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button