
खेडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई; ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त
खेड : खेड ते शिवतर जाणाऱ्या रस्त्यावर जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर लोटे पोलीस दूरक्षेत्राच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ) अन्वये एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी प्रविण गोविंद कोलगे (वय ५२, रा. प्रशांत कॉम्प्लेक्स, भरणे नाका, ता. खेड, जि. रत्नागिरी) याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या कारवाईत एकूण ८२ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. यामध्ये चांदी रंगाची टीव्हीएस कंपनीची ज्युपिटर दुचाकी (क्र. एमएच ०८ एएच २५१३), रोख रक्कम तसेच पावती पुस्तक व इतर जुगाराचे साहित्य यांचा समावेश आहे.
ही कारवाई लोटे पोलीस दूरक्षेत्र, ता. खेड, जि. रत्नागिरी यांच्या अंतर्गत करण्यात आली असून, महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार पुढील तपास सुरू आहे.




