रत्नागिरी जिल्ह्यातील ‘विशेष कार्यकारी अधिकारी’ रद्द ,महिन्याभरात नवीन नियुक्त्या


*रत्नागिरी, दि. 5 : जिल्ह्यात असणारी विशेष कार्यकारी अधिकारी ही सध्याची पदे रद्द करुन येत्या महिन्याभरात नवीन नियुक्तीची यादी जाहीर करण्याचा निर्णय पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला
या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, आमदार किरण सामंत, जि. प. उपाध्यक्ष विलास चाळके, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
सध्या जिल्ह्यात अस्तित्वात असणारी विशेष कार्यकारी अधिकारी रद्द करुन महिन्याभरात नवीन नियुक्त्या करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे सध्या असणाऱ्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे असणारी शिक्के जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी विविध योजनांकरिता शासकीय जागा उपलब्ध करुन देण्यासंदर्भात आढावा घेण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी, कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, राजापूर प्रांतांधिकारी विश्वजीत गाताडे, एमआयडीसी क्षेत्रिय अधिकारी वंदना खरमाळे, तहसिलदार राजाराम म्हात्रे, राजापूर तहसिलदार विकास गंबरे, लांजा तहलिदार प्रियांका ढोळे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button