
चिपळूण कराड मार्गावर कारने धडक दिल्याने पायी जाणारा तरूण जखमी
पायी रस्त्या ओलांडत असताना पार्श्व अमर गरुड (१९, पिंपळी खुर्द) या तरुणाला कारने धडक दिल्याची घटना चिपळूण-कराड मार्गावरील शार्दूल एन्ट्प्रायझेजच्या समोर रविवारी घडली. यामध्ये हा तरुण जखमी झाला आहे. या अपघातानंतर कार चालक पळून गेला. याप्रकरणी कार चालकावर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद शिवम राजकुमार सिंग (१९, मूळ-नाशिक सध्या पिंपळी खुर्द) याने दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवम व त्याचा मित्र पार्श्व असे दोघेजण चालत रस्त्या ओलांडत होते. त्याचवेळी कारचालकाने निष्काळजीपणे कार चालवल्याने त्याची धडक पार्श्वला बसली.




