रस्त्यावरील भटक्या गोमातेला वाचविण्याचा प्रयत्न करताना बसवरील नियंत्रण सुटून बोरिवली-जयगड बसला निवेंडी फाट्याजवळ अपघात


रत्नागिरी : रस्त्यावरील भटक्या गोमातेला वाचविण्याचा प्रयत्न करताना बसवरील नियंत्रण सुटून अपघात झाल्याची घटना आज (१२ जून) सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

बोरिवली-जयगड (एमएच-२०-बीएल-२९४५) ही बस आज सकाळी तालुक्यातील निवेंडी फाट्याच्या पुढील बाजूला आली असता रस्त्यावर असणारी गाय अचानक गाडीच्या आडवी आली. या गाईला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना बसचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी रस्ता सोडून झाडावर आपटली.

दरम्यान, या गाडीतून ६ प्रवासी प्रवास करत होते; मात्र कोणीही गंभीर अथवा जखमी नसल्याची माहिती घटनास्थळावरून प्राप्त झाली आहे. झाडाला जोरात धडक दिल्यामुळे बसची पुढची काच तुटून मोठे नुकसान झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button