खेड शहरातील जगबुडी नदीवरील गणेश विसर्जन घाटाचा जीर्ण प्लॅटफॉर्म कोसळला


खेड शहरातील जगबुडी नदीवरील गणेश विसर्जन घाटावरील प्लॅटफॉर्म जीर्ण अवस्थेमुळे कोसळल्याने आगामी गणेशोत्सव व नवरात्रोत्सवानंतर होणार्‍या दुर्गामाता विसर्जनाच्या व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या प्लॅटफॉर्मच्या कोसळण्यामुळे विसर्जनावेळी भाविक आणि स्वयंसेवकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
जगबुडी नदीवरील हा विसर्जन घाट खेड शहरासह परिसरातील अनेक गावांसाठी महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. दरवर्षी सुमारे दोन हजारांहून अधिक गणेशमूर्तीचे विसर्जन येथे केले जाते. विसर्जन प्रक्रियेदरम्यान नदीपात्रात सुरक्षितरीत्या जाणे, मूर्ती वाहून नेणे आणि स्वयंसेवकांकडून व्यवस्थापन करणे यासाठी घाटावरील प्लॅटफॉर्मची मोठी मदत होत होती. मात्र, कालांतराने हा प्लॅटफॉर्म जीर्ण झाल्याने अखेर तो कोसळला आहे. यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात विसर्जन व्यवस्थापनाचे मोठे आव्हान उभे राहाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विशेषतः पावसाळ्यानंतर नदीच्या पाण्याची पातळी आणि प्रवाह लक्षात घेता सुरक्षिततेच्या दृष्टीने सक्षम सुविधा उपलब्ध असणे आवश्यक असल्याचे गणेशभक्तांचे मत आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button