महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलसाठी रांगाच रांगा; राज्यातील 2 हजार पेट्रोल पंप कोरडे?


राज्यातल्या पेट्रोल पंपांवर सध्या अभूतपूर्व अशी आणीबाणी पाहायला मिळतेय.एकीकडे पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत असतानाच दुसरीकडे राज्यातील 2 हजार पेट्रोल पंप पूर्णपणे कोरडे ठाक पडलेत.उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा ते थेट गडचिरोलीपर्यंत डिझेल आणि पेट्रोल टंचाईमुळे हाहाकार उडालाय.
रत्नागिरीतही इंधन तुटवडा

रत्नागिरी शहरातील चार पेट्रोल पंपावरचं पेट्रोल आणि डिझेल संपले आहे. शहरातील मुख्य पेट्रोल पंपावर इंधन संपल्याचे बोर्ड झळकले आहेत. तर शहरातील माळ नाका जयस्तंभ इथल्या पेट्रोल पंपावर फक्त पॉवरचं पेट्रोल शिल्लक आहे. या पंपावर दोन दिवसांपासून साध्या पेट्रोलचा टँकर आलेला नाही अशी माहिती समोर आली आहे. नाईलाजाने 119. 24 पैसे प्रतिलिटर किंमत असलेले पॉवर पेट्रोल वाहन चालकांना खरेदी करावा लागत आहे. त्यामुळे वाहनचालकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button